ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना बँकांत चांगली वागणूक मिळत नसल्याच्या प्रचंड तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार हयातीचे प्रमाणपत्र घेण्यापासून केवायसीसुद्धा बँकांनी या लोकांच्या घरी जाऊन जमा करून घ्यावेत, असे निर्देशांत म्हटले आहे..70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना बँकांनी विविध सेवा घरपोच द्याव्यात, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यासाठी या वर्षी डिसेंबरपर्यंतची मुदतही दिली आहे. अशा लोकांना खात्यातील रक्कम घरपाेच देण्यापासून चेकबुक आणि डिमांड ड्राफ्ट पुरवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 31 डिसेंबरपर्यंत या निर्देशांचे पालन सुरू व्हावे, असेही आरबीआयने म्हटले आहे.सर्व बँकांनी बचत खातेधारकांना वर्षातून 25 चेक मोफत देण्याचे निर्देशही दिले आहेत. हे चेकबूक घेण्यासाठी खातेधारकांना बँकेत येण्याची गरज नाही. एखादा खातेदाराने केवायसी पूर्ण केले असेल तर त्याची जन्मतारीख पाहून बँकांना त्याचे खाते ‘ज्येष्ठ नागरिक खाते’ म्हणून बदलावे लागणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews